संपन्न वारसा मध्ये आपले स्वागत!
‘संपन्न वारसा’ मागील भूमिका :
भारत देशाला फार मोठी प्राचीन ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा आहे. अनादि अनंत वाहणाऱ्या कालप्रवाहात लोकजीवन जगताना अनेक नवनवीन प्रथा, परंपरा, सण, समारंभ यांनी मानवी जीवन समृद्ध केले. या संदर्भात बरीचशी माहिती छापील पुस्तक स्वरूपात अस्तित्वात आहे. परंतु या परंपरांचे आधुनिक स्वरूपात दस्ताऐवजीकरण होणे आवश्यक आहे. इंटरनेटसारख्या आधुनिक संपर्कमाध्यमांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा वारसा पोहोचवणे देखील महत्त्वाचेच!
ज्ञानभाषा इंग्रजीच्या दबावाखालीदेखील हा पारंपरिक ठेवा पुढील पिढीला ज्ञात करून देणे गरजेचे आहे. कोणताही सण साजरा करणे म्हणजे फक्त नवनवीन कपडे, मिठाई, फोटो, पार्टी असे नव्हे. हे सण साजरे करण्यामागील मूळ गाभा, त्याची संकल्पना, त्यामागील पार्श्वभूमी, या सणांचे बदलते स्वरूप सहज सोप्या शब्दांमध्ये लोकांसमोर मांडणे हाच या परंपरेच्या पथिकांचा उद्देश!
या वेबसाईटवरील प्रत्येक विभागातील लेख आपल्याला आवडतील अशी अपेक्षा! आपल्याला जे जे आवडेल ते ते अधिकाधिक लोकांसोबत नक्की शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला sampannavarasa@gmail.com वर ईमेलद्वारे नक्की कळवा..
वेबसाइटवरील लेख वाचण्यासाठी क्लिक करा – https://sampannavarasa.com/antarang-content/