Month: March 2020

शास्त्रीय नजरेतून गुढीपाडवा

भारतामध्ये कोणताही सण साजरा करताना काही प्रथा परंपरांचे अगत्याने पालन केले जाते. त्यामधील प्रत्येक गोष्टीला प्रतीकात्मक अर्थ आहेत. जेव्हा आपण प्रतीकांच्या मुळाशी जाऊन विचार करतो तेव्हा भारतीयांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. गुढीपाडव्याच्या निमित्ताने अशाच काही प्रतीकांचा शास्त्रीय दृष्टीने घेतलेला परामर्श!

मत्स्य अवतार

हिंदू वर्षाचा तिसरा दिवस चैत्र शुद्ध तृतीया ही मत्स्य जयंती मानली जाते. विष्णूच्या प्रमुख दशावतारांपैकी पहिला अवतार मत्स्य या दिवशी अवतीर्ण झाला असे मानतात. पुराणांनुसार पृथ्वीला प्रलयापासून तारण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला.

विष्णु दशावतार

जेव्हा जेव्हा पृथ्वीवर दुष्टांचा प्रादुर्भाव वाढतो, दुष्ट सुष्टाच्या संघर्षात दुष्टाचे पारडे जड होते तेव्हा तेव्हा भगवान श्री विष्णू त्या काळच्या परिस्थितीशी अनुरूप असा अवतार धारण करतात. दुष्टांचे निर्दालन करून पृथ्वीचा भार हलका करतात. असे दहा अवतार आपण या विभागातील लेखांमधून पाहू.

भारतीय सण

महाकवी कालिदासाने ‘उत्सवप्रियः खलु मनुष्य:’ असे म्हणले आहे. म्हणजेच मनुष्याला उत्सव, सण साजरे करणे अतिशय प्रिय आहे. आनंदाचा एक सहजसुंदर क्षण सण देऊन जातो. प्रत्येक नवीन सण नवी आशा नवा उत्साह देऊन जातो. उत्सवप्रिय भारतामधील सणांचा विचार केला तर कृषीकर्मातील महत्त्वाचे टप्पे आणि ऋतुबदल अशा दोन अंगांनी ते जाताना दिसतात. प्रत्येक सण साजरा करण्यामागे जो काही एक विशिष्ट उद्देश असतो तो त्या सणाच्या माध्यमातून समाजापर्यंत निकोपपणे पोहोचवणे हीच सणांची इतिकर्तव्यता! पूर्ण वाचण्यासाठी वरील ‘भारतीय सण’ या लिंकवर क्लिक करा.

चैत्रांगण – भाग २

चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया दारामध्ये गोमयाने सारवून त्याच्यावर पांढऱ्या शुभ्र रांगोळीने आशयसंपन्न अशी शुभप्रतिके रेखाटली जातात. या शुभप्रतिकांची संख्या 51 असते. त्यातील काही प्रमुख प्रतिके पुढे वर्षभरात येणाऱ्या सणांची द्वाही फिरवतात. तर इतर काही प्रतिके काही विशिष्ट संकेतांचे निर्देशन करतात. येणाऱ्या नवीन वर्षात आपणास ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, सुख, शांती, शीतलता, तेजोमयता लाभावी अशी संपन्न आकांक्षा बाळगणारे हे ‘चैत्रांगण’ – महाराष्ट्रभूमीचे वैभव!!

चैत्रांगण – भाग १

गुढीपाडव्यापासून चैत्र महिना चालू होतो – मराठी नववर्षाची सुरुवात! बळीराजाच्या दृष्टीने हा काळ तसा थोडा विश्रांतीचा. पण त्याच्या कारभारणीला मात्र संपूर्ण वर्षाचे नियोजन याच महिन्यात करायचे असते. त्यातून चैत्रगौर, तिची लेक माहेरी आली की तिचे स्वागत दारातच केले जाते ते ‘चैत्रांगण’ ने!

सुभाषित – १

सुभाषितांमध्ये बऱ्याच वर्षांचे शहाणपण आणि अनुभव यांचा संगम झालेला आढळतो. या सुभाषितांबद्दलच असणारे एक सुभाषित!

पोतराज

एखाद्याचे मूल जगत नसल्यास मूल जगले तर ते देवीला वाहण्याचा नवस करतात. हे लक्ष्मीआईला नवसाचे सोडलेले मूल म्हणजेच पोतराज. या पोतराजांचे ढोबळमानाने तीन प्रकार मानले जातात – स्थानिक, देऊळवाले आणि गाणी म्हणणारे. पोतराज परंपरेचा सांस्कृतिक वारसा जपतानाच त्यांच्यातील माणूसपण जपण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे. काही अंशाने काळी किनार असलेले त्यांचे हे जीवन सुसह्य व्हावे यासाठी ‘पोतराज निर्मूलन अभियान’सारखे कार्यक्रम राबवून त्यांना प्रमुख समाज प्रवाहाचे घटक बनवणे अत्यंत गरजेचे आहे.

लोकसंस्कृती – ओळख

हिंदुस्थानच्या संस्कृती इतिहासाचा संगीत हाच आत्मा असून लोकांमधील समष्टीभाव जेव्हा लय साधतो तेव्हा उत्स्फूर्तपणे लोकगीतांची निर्मिती होते. लोककलावंत लोकमनोरंजनासाठी गायन, नर्तन, नाट्यदर्शन याचे सहाय्य घेतात. सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात असणाऱ्या काही लोककलाकारांची माहिती आपण या विभागातून पाहणार आहोत. लुप्त होत चाललेल्या लोकपरंपरेची थोडक्यात माहिती करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न!

परंपरा – ओळख

सर्व मानवी संस्कृती म्हणजे परंपरा. मानवी जीवनाच्या संस्कृतीच्या सर्व शाखा – जुनी परंपरा -> परिवर्तन -> नवी परंपरा अशा चक्रात अव्याहत फिरत असतात. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे जतन करण्यासाठी दिलेला परंपरा हा सांस्कृतिक वारसा असतो. या विभागातील लेखांमधून आपण भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील अनेक परंपरांचा मनोरंजक वेध घेणार आहोत. त्याची प्रतीकात्मकता उलगडण्याचा प्रयत्न करतानाच त्यामधील शास्त्रीय आधाराचा धागा देखील शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Theme: Overlay by Kaira