Month: April 2020

सुभाषित – भाग ३

निसर्गाकडून दानाचा गुण नक्कीच शिकावा. दानाचे महत्त्व सांगणारी दोन सुभाषिते या भागात!

अक्षय्यतृतीया

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानली जाणारी तिथी म्हणजे अक्षय्यतृतीया. वैशाख शुद्ध तृतीयेस ‘अक्षय्यतृतीया’ म्हणले जाते. ‘आखा-तीज’, ‘आखिदी’, ‘अकिदी’ ही याची बोलीभाषेतील नावे.

कूर्म अवतार – भाग २

कूर्माला भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय शुभ मानले जाते. कूर्मास लक्ष्मीचे प्रतीक मानतात. कासव धैर्य शांतीचे प्रतीक आहे. त्याच्या योगे धनप्राप्ती होते अशी समजूत आहे.

कूर्म अवतार – भाग १

‘कूर्म’ अथवा ‘कच्छप’ हा विष्णुच्या दहा अवतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो. श्री विष्णुच्या या अवतार उत्पत्तीप्रीत्यर्थ वैशाख शुद्ध पौर्णिमेला ‘कूर्म’ जयंती साजरी केली जाते.

लोकगायक – वासुदेव

कृष्णाचे भक्त म्हणवून घेणारी ही जमात कृष्णाची प्रतीके आपल्या वेशभूषेत सन्मानाने वागविते. मोरपिसांचा उंच टोप, घेरदार झगा, सुरवार, खांद्यावर उपरणे, गळ्यात झोळी, कंबरेला छोटी बासरी (पावरी) अशा रूपात हे वासुदेव त्यांच्या ठराविक गावामध्ये भिक्षाफेरी मारतात. अविरत फिरणाऱ्या कालचक्राच्या गतीत ‘रामाच्या पारी’ हा शब्द जणू हरविल्यासारखा झाला आणि गावागावातून ‘दान पावलं, दान पावलं’ असे गात पायात चाळ, हातात मंजिरी, चिपळ्या वाजवित सकाळीच गाव जागे करणारे ‘वासुदेव’ अभावानेच दिसू लागले. मुळातच कृष्णभक्त असलेली ही भटकी जमात आता कालबाह्य होत आहे.

चांदोबाचा अंगरखा

दिवस मावळतो तशी रात्र पडायला सुरुवात होते आणि आकाशात एक चमकदार चांदीसारखा गोळा दिसायला लागतो. तोच आपला चांदोबा! भरपूर प्रकाश देऊन रात्र उजळून टाकणारा चांदोबा! तर बरं का मुलांनो, तुमच्या आईसारखीच या चंद्रालादेखील आई होती. चांदोबा म्हणजे तिचा लाडोबा नुसता! याच चांदोबाच्या अंगरख्याची ही गोष्ट!

कालिदासाचे गर्वहरण

महाकवी कालिदास – एक प्रतिभावान संस्कृत महाकाव्ये रचणारा कवी. एकदा या विद्वान महाकवीला स्वतःच्या ज्ञानाचा खूप अहंकार झाला. मग हा अहंकार दूर कसा झाला असेल बरं? वाचा या गोष्टीमध्ये.

चैत्रगौरी आणि खाद्यपरंपरा

चैत्र शुद्ध तृतीया, चैत्रगौरीचे आगमन. चैत्रगौरीसंदर्भात काही महत्त्वाच्या परंपरा चालत आलेल्या दिसतात. त्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन तर दिसतोच पण त्याचबरोबर ऋतूबदलातील आहार नियोजन केल्याचे दिसून येते.

चैत्रगौरी

चैत्र शुद्ध तृतीया, ‘गौरीतीज’. संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत्वाने ब्राह्मण समाजात यादिवशी चैत्रगौरीची स्थापना केली जाते. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया (अक्षयतृतीया) अशी महिनाभर ही चैत्रगौर माहेरी येते असे समजून तिची पूजा केली जाते.

देऊळ बंद

देऊळ बंद

एका जागी गर्दी करून होणाऱ्या कोरोना विषाणूंच्या संक्रमणाला आळा घालणे हा मंदिरबंदीचा मुख्य उद्देश! परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी देवाने दरवाजे बंद केले असे ऐकून देवाने मानवाच्या बुद्धीची कीवच केली असेल. उठा, डोळे उघडा, जागे व्हा! मंदिरामधील देव आज प्रत्येक आरोग्यकेंद्रामधून आरोग्यसेवकाच्या रूपात वावरतो आहे याची जाणीव असू द्या. आपण सर्वांनी एकदिलाने, एकजुटीने सकारात्मकतेने या संकटावर मात करण्याचा संकल्प सोडू या!

Theme: Overlay by Kaira