सुभाषित – भाग ४
संस्कृत भाषेत असणाऱ्या सुभाषितांमधील नर्म विनोद ही फारशी माहीत नसलेली खासियत! या विनोदाच्या विषयांमधून अगदी देव सुद्धा सुटत नाहीत!
संस्कृत भाषेत असणाऱ्या सुभाषितांमधील नर्म विनोद ही फारशी माहीत नसलेली खासियत! या विनोदाच्या विषयांमधून अगदी देव सुद्धा सुटत नाहीत!
वराह अवताराबद्दल अजूनही काही रंजक माहिती तसेच त्यासंबंधीचा वैज्ञानिक दृष्टिकोन या लेखात.
हिंदू धर्मानुसार विष्णू दशावतारांपैकी वराह (सूकर) हा अवतार तिसरा मानला जातो.भगवान वराहाचे अवतरण भाद्रपद शुक्ल तृतीया या दिवशी झाले. त्यामुळे या दिवसास वराह जयंती असे मानले जाते. भारतामध्ये निरनिराळ्या ठिकाणी वराह जयंतीचा उत्सव साजरा केला जातो.
रात्र नुकतीच सरत आलेली असते. अजून तांबडेदेखील फुटायचे असते. इतक्या ‘पिंगळा’वेळी खोपटीमधील ‘पिंगळा’ माणूस जागा होतो. भल्या पहाटे गावात येणार हा भिक्षेकरी कोणीही पैसे अथवा धान्य स्वरूपात भिक्षा दिली की स्वतःभोवती गिरकी घेऊन उडी मारतो. तेव्हा आपण समजावे की आपण दिलेले ‘पाऊड’ (दान) पावले!
“चालणाऱ्याचे नशीब चालते नि बसणाऱ्याचे बसते” प्रयत्न आणि कष्ट यांचे जीवनातील महत्त्व सांगणारी ही बोधकथा आमच्या छोट्या मित्रांसाठी!
चिंकू सशाच्या भित्रेपणाची ही एक मजेशीर गोष्ट!
अक्षय्यतृतीया खानदेशामध्ये ‘आखाजी’ म्हणून ओळखली जाते. भारतामध्ये इतर ठिकाणी कार्तिक महिन्यात दिवाळी साजरी होते. पण खानदेशात मात्र ‘आखाजी’लाच दिवाळीचे महत्त्व आहे. सर्व वार्षिक परंपरा, सालदार बलुतेदारांचे मान-पान आखाजीच्या शुभमुहूर्तावरच पार पडतात.