नाग /साप – समज गैरसमज
आपल्या मनात साप /नाग या प्राण्याविषयी असंख्य गैरसमजुती असल्याने आपण आपल्या सोयीसाठी त्याच्या जीवावर उठतो ,त्याला साक्षात मृत्यूदूत समजतो. नाग / साप अशासारखे प्राणी पर्यावरण साखळीतील एक महत्वाचा दुवा आहेत.
आपल्या मनात साप /नाग या प्राण्याविषयी असंख्य गैरसमजुती असल्याने आपण आपल्या सोयीसाठी त्याच्या जीवावर उठतो ,त्याला साक्षात मृत्यूदूत समजतो. नाग / साप अशासारखे प्राणी पर्यावरण साखळीतील एक महत्वाचा दुवा आहेत.
श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच ‘नागपंचमी’. ‘नागपंचमी’ हा खास स्त्रियांचा मानला गेलेला सण. पृथ्वीचा आधार, रक्षणकर्ता अशी नागदेवतेची पुराणातील वर्णने असोत अथवा सद्यस्थितीतील नागपंचमीला होणारे त्याचे पूजन असो, प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनाचा एक कोपरा या जातिवंत प्राण्याने व्यापला आहे.
उगवत्या सूर्याला वंदन करून आपली दिनचर्या सुरु करणारी भारतीय परंपरा. आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने वातावरणातील कोंदटलेपण आणि अशा हवामानामुळे येणारी मनावरील मरगळ दीपदर्शनाने, दीपपूजनाने झटक्यात दूर होते. जेव्हा तेजाची पूजा ‘तमसो S मा ज्योतिर्गमय’ म्हणून केली जाते तेव्हा मानवाचे जीवन प्रकाशाने उजळून निघते!
लोककलाकारांमधील ‘चित्रकथी’ हा प्रकार आजघडीला अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. परंतु समृद्ध अशा निसर्गसंपन्न
तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यामधील पिंगुळी या गावातील आदिवासी ठाकर समाज ‘चित्रकथी’ ही पारंपरिक कला जोपासत आहे. चित्रांच्या आधारे कथाकथन अथवा गायन सादर करणारे ठाकर आदिवासी ‘चित्रकथी’ कलाप्रकार सादर करतात.
‘जो जो ज्याचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण’ श्री दत्तगुरूंनी व्यक्तीला गुरु न मानता परिसरातील प्रत्येक चांगला गुण स्वीकारला. असे २४ गुरु त्यांनी केले ,परंतु असे विद्या शिकवणारे गुरु वेगळे. त्यांच्यामुळे आपण जीवन जगायचे कसे हे शिकतो, हा जीवनसागर पार करून पुढील प्रवासासाठी फक्त सद्गुरूच समर्थ असतो.