Month: September 2020

अधिक मास उत्पत्ती कथा

सध्या चालू असलेल्या अधिक मासाची नेमकी उत्पत्ती कधी झाली, कोणी केली , त्याला ‘मलमास’ का म्हणतात? तसेच मलमासाचे नाव ‘पुरुषोत्तम मास’ कसे झाले या आणि आणि अशा अधिक मासाविषयी काही मनोरंजक कथा !!

अधिक मास

हिंदू पंचांगानुसार ज्या चांद्र महिन्यात एकही सूर्य संक्रमण येत नाही त्याला ‘असंक्रांती मास’ म्हणतात. बहुतेक वेळा साडे बत्तीस महिन्यांनी हा मास येतो. दर तीन वर्षांनी येणाऱ्या तेराव्या महिन्याला ‘अधिकमास, मलमास, पुरुषोत्तम मास ,खरमास, मलिम्लुच मास’ अशी अनेक नावे आहेत.

संस्कृत सुभाषिते – भाग ५

संस्कृत सुभाषिते – भाग ५

अन्नदानाचे. महत्त्व विशद करणारी काही संस्कृत सुभाषिते त्यांच्या अर्थासहित!

पितृपक्ष आणि कावळा

पितृपक्ष सुरु झाला की कावळ्याचा भाव एकदम वधारतो. एरव्ही अशुभ, अमंगल मानल्या जाणाऱ्या कावळ्याला अगदी अगत्याने अन्न भरविण्यात येते. का या कावळ्याचा मृत व्यक्तीच्या आत्म्याशी संबंध जोडला जातो?

श्राद्धकर्त्यासाठी काही नियम

श्राद्ध हा विधी आपल्या पूर्वजांना सद् गती लाभावी म्हणून करण्यात येणारा विधी आहे. हा विधी करीत असताना खालील नियम पाळावेत असे शास्त्र आहे.

कर्णाची आख्यायिका

महाभारतामधील कर्ण दानशूर म्हणून सर्वश्रुत आहे. पण याच कर्णाला अन्नदान करण्यासाठी स्वर्गातून परत पृथ्वीवर यावे लागल्याची ही आख्यायिका!

पितृपक्ष प्रथेमागील कहाणी

भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृ पक्ष, पक्ष पंधरवडा अगदी बोली भाषेत पाहिलं तर पित्तर पाठ! भारतीय हिंदूंमध्ये ही परंपरा श्रद्धेने पाळली जाते. ही प्रथा केव्हा सुरु झाली आणि याच काळात हे सर्व श्राद्धादी विधी का केले जातात?

पितृपक्ष

भाद्रपद पौर्णिमेला अगस्त्य ऋषींचे पूजन केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षास सुरवात होते. या पक्षामध्ये आपल्या दिवंगत पूर्वजांचे श्रद्धापूर्वक समरण केले जाते. तसेच अगदी आपल्या हातून नकळत मारले गेलेले किडा -मुंगी ,पाडलेले वृक्ष, आपण पाळलेली पण मृत्यू पावलेली जनावरे, आपल्या घरी मदतनीस म्हणून असणाऱ्या परंतु आता हयात नसणाऱ्या व्यक्ती यांचे देखील श्रद्धापूर्वक स्मरणकेले जाते.

अनंत व्रत कथा

अनंत व्रत करण्यामागे अशीच एक पौराणिक कथा आहे. मनुष्याने ठेवलेली गाढ श्रद्धा त्याला सर्व अडचणींमधून सुखरूप बाहेर काढते. याच श्रद्धेला पूर्वसुरींनी पुराणकथेचे मनोरंजक रूप दिले आणि जनमानसामध्ये अशा कथांचे स्थान अढळ बनविले.

Theme: Overlay by Kaira