Category: लोकसंस्कृती

बहुरूपी

बहुरूपी म्हणजे लोकांच्या मनोरंजनासाठी निरनिराळी रूपे धारण करणारी व्यक्ती. ही एक भटकी भिक्षेकरी जमात असून ही महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा ,पूर्व विदर्भ अशा वेगवेगळ्या ठिकाणी आढळते.

वाघ्या – मुरळी

खंडोबा हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या मधील एक लोकप्रिय दैवत. या खंडोबाचे पुरुष उपासक म्हणजे वाघ्ये,तर स्त्री उपासक म्हणजे मुरळी.

गोंधळ – एक विधिनाट्य

घरात कोणतेही मंगल कार्य संपन्न झाल्यानंतर कुलाचारा प्रमाणे आपापल्या कुलदेवतेच्या उपासनेने प्रित्यर्थ गोंधळ घातला जातो. गोंधळी लोकांचा वृंद पारंपरिक पोशाखात येतो.

आम्ही अंबेचे गोंधळी

महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मंगल कार्याची सांगता गोंधळ घालून केली जाते. हा गोंधळ घालणारे गोंधळी लोक गायक असतात. ते अष्टपैलू कलावंत असतात. गोंधळ घालताना देवीची गाणी, स्तवने ते सादर करतात. ही गाणी पारंपरिक असून मौखिक परंपरेने ते ही गाणी जतन करतात.

कहाणी चित्रकथींची

लोककलाकारांमधील ‘चित्रकथी’ हा प्रकार आजघडीला अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. परंतु समृद्ध अशा निसर्गसंपन्न
तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यामधील पिंगुळी या गावातील आदिवासी ठाकर समाज ‘चित्रकथी’ ही पारंपरिक कला जोपासत आहे. चित्रांच्या आधारे कथाकथन अथवा गायन सादर करणारे ठाकर आदिवासी ‘चित्रकथी’ कलाप्रकार सादर करतात.

पिंगळा

रात्र नुकतीच सरत आलेली असते. अजून तांबडेदेखील फुटायचे असते. इतक्या ‘पिंगळा’वेळी खोपटीमधील ‘पिंगळा’ माणूस जागा होतो. भल्या पहाटे गावात येणार हा भिक्षेकरी कोणीही पैसे अथवा धान्य स्वरूपात भिक्षा दिली की स्वतःभोवती गिरकी घेऊन उडी मारतो. तेव्हा आपण समजावे की आपण दिलेले ‘पाऊड’ (दान) पावले!

पोतराज

एखाद्याचे मूल जगत नसल्यास मूल जगले तर ते देवीला वाहण्याचा नवस करतात. हे लक्ष्मीआईला नवसाचे सोडलेले मूल म्हणजेच पोतराज. या पोतराजांचे ढोबळमानाने तीन प्रकार मानले जातात – स्थानिक, देऊळवाले आणि गाणी म्हणणारे. पोतराज परंपरेचा सांस्कृतिक वारसा जपतानाच त्यांच्यातील माणूसपण जपण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे. काही अंशाने काळी किनार असलेले त्यांचे हे जीवन सुसह्य व्हावे यासाठी ‘पोतराज निर्मूलन अभियान’सारखे कार्यक्रम राबवून त्यांना प्रमुख समाज प्रवाहाचे घटक बनवणे अत्यंत गरजेचे आहे.

लोकसंस्कृती – ओळख

हिंदुस्थानच्या संस्कृती इतिहासाचा संगीत हाच आत्मा असून लोकांमधील समष्टीभाव जेव्हा लय साधतो तेव्हा उत्स्फूर्तपणे लोकगीतांची निर्मिती होते. लोककलावंत लोकमनोरंजनासाठी गायन, नर्तन, नाट्यदर्शन याचे सहाय्य घेतात. सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात असणाऱ्या काही लोककलाकारांची माहिती आपण या विभागातून पाहणार आहोत. लुप्त होत चाललेल्या लोकपरंपरेची थोडक्यात माहिती करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न!

Theme: Overlay by Kaira