अनंत व्रत
अनंत चतुर्दशी म्हटले की पटकन डोळ्यासमोर गणपती विसर्जन येते. पण हिंदू धर्मात या दिवसाला आणखी वेगळे महत्त्व आहे. याच दिवशी वैष्णव पंथीय लोक ‘अनंत व्रत’ करतात.
महाराष्ट्रामध्ये बारामती जिल्ह्यातील काऱ्हाटी येथे, तसेच पुणे जेजुरी, अहमदनगर अशा काही ठिकाणी हा ‘शिराळशेटीचा उत्सव ‘श्रावण शुद्ध षष्ठीला साजरा केला जातो. या निमित्ताने ह्या श्रियाळशेठच्या धर्मशीलतेची आणि दातृत्वाची उजळणी केली जाते आणि मानवतेचे दर्शन घडविले जाते.
अक्षय्यतृतीया खानदेशामध्ये ‘आखाजी’ म्हणून ओळखली जाते. भारतामध्ये इतर ठिकाणी कार्तिक महिन्यात दिवाळी साजरी होते. पण खानदेशात मात्र ‘आखाजी’लाच दिवाळीचे महत्त्व आहे. सर्व वार्षिक परंपरा, सालदार बलुतेदारांचे मान-पान आखाजीच्या शुभमुहूर्तावरच पार पडतात.
कृष्णाचे भक्त म्हणवून घेणारी ही जमात कृष्णाची प्रतीके आपल्या वेशभूषेत सन्मानाने वागविते. मोरपिसांचा उंच टोप, घेरदार झगा, सुरवार, खांद्यावर उपरणे, गळ्यात झोळी, कंबरेला छोटी बासरी (पावरी) अशा रूपात हे वासुदेव त्यांच्या ठराविक गावामध्ये भिक्षाफेरी मारतात. अविरत फिरणाऱ्या कालचक्राच्या गतीत ‘रामाच्या पारी’ हा शब्द जणू हरविल्यासारखा झाला आणि गावागावातून ‘दान पावलं, दान पावलं’ असे गात पायात चाळ, हातात मंजिरी, चिपळ्या वाजवित सकाळीच गाव जागे करणारे ‘वासुदेव’ अभावानेच दिसू लागले. मुळातच कृष्णभक्त असलेली ही भटकी जमात आता कालबाह्य होत आहे.
चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया दारामध्ये गोमयाने सारवून त्याच्यावर पांढऱ्या शुभ्र रांगोळीने आशयसंपन्न अशी शुभप्रतिके रेखाटली जातात. या शुभप्रतिकांची संख्या 51 असते. त्यातील काही प्रमुख प्रतिके पुढे वर्षभरात येणाऱ्या सणांची द्वाही फिरवतात. तर इतर काही प्रतिके काही विशिष्ट संकेतांचे निर्देशन करतात. येणाऱ्या नवीन वर्षात आपणास ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, सुख, शांती, शीतलता, तेजोमयता लाभावी अशी संपन्न आकांक्षा बाळगणारे हे ‘चैत्रांगण’ – महाराष्ट्रभूमीचे वैभव!!
गुढीपाडव्यापासून चैत्र महिना चालू होतो – मराठी नववर्षाची सुरुवात! बळीराजाच्या दृष्टीने हा काळ तसा थोडा विश्रांतीचा. पण त्याच्या कारभारणीला मात्र संपूर्ण वर्षाचे नियोजन याच महिन्यात करायचे असते. त्यातून चैत्रगौर, तिची लेक माहेरी आली की तिचे स्वागत दारातच केले जाते ते ‘चैत्रांगण’ ने!
सर्व मानवी संस्कृती म्हणजे परंपरा. मानवी जीवनाच्या संस्कृतीच्या सर्व शाखा – जुनी परंपरा -> परिवर्तन -> नवी परंपरा अशा चक्रात अव्याहत फिरत असतात. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे जतन करण्यासाठी दिलेला परंपरा हा सांस्कृतिक वारसा असतो. या विभागातील लेखांमधून आपण भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील अनेक परंपरांचा मनोरंजक वेध घेणार आहोत. त्याची प्रतीकात्मकता उलगडण्याचा प्रयत्न करतानाच त्यामधील शास्त्रीय आधाराचा धागा देखील शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.