Category: विष्णू दशावतार

नरसिंह रूपे

भगवान विष्णूंच्या दशावतारांमध्ये नरसिंह या अवताराचे जितके वैविध्य दिसून येते, तितके दुसऱ्या कोणत्याच अवताराच्या स्वरूपांमध्ये दिसून येत नाही. स्थूल मानाने पाहिल्यास स्थौण नरसिंह, गिरिज नरसिंह, केवल नरसिंह, विदरण नरसिंह, लक्ष्मी नरसिंह, योग नरसिंह, नृत्य नरसिंह अशा विविध स्वरूपात आपल्याला नरसिंह मूर्ती दिसून येतात. यामधील काही रूपे उग्र आहेत तर काही रूपे शांत आहेत.

नरसिंह जयंती

वैशाख शुद्ध त्रयोदशी युक्त चतुर्दशी ही तिथी नरसिंह जयंती म्हणून ओळखली जाते. श्री भगवान विष्णूच्या दशावतारापैकी चौथा अवतार हा नरसिंह अवतार मानला जातो.

वराह अवतार – भाग २

वराह अवताराबद्दल अजूनही काही रंजक माहिती तसेच त्यासंबंधीचा वैज्ञानिक दृष्टिकोन या लेखात.

वराह अवतार

हिंदू धर्मानुसार विष्णू दशावतारांपैकी वराह (सूकर) हा अवतार तिसरा मानला जातो.भगवान वराहाचे अवतरण भाद्रपद शुक्ल तृतीया या दिवशी झाले. त्यामुळे या दिवसास वराह जयंती असे मानले जाते. भारतामध्ये निरनिराळ्या ठिकाणी वराह जयंतीचा उत्सव साजरा केला जातो.

कूर्म अवतार – भाग २

कूर्माला भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय शुभ मानले जाते. कूर्मास लक्ष्मीचे प्रतीक मानतात. कासव धैर्य शांतीचे प्रतीक आहे. त्याच्या योगे धनप्राप्ती होते अशी समजूत आहे.

कूर्म अवतार – भाग १

‘कूर्म’ अथवा ‘कच्छप’ हा विष्णुच्या दहा अवतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो. श्री विष्णुच्या या अवतार उत्पत्तीप्रीत्यर्थ वैशाख शुद्ध पौर्णिमेला ‘कूर्म’ जयंती साजरी केली जाते.

मत्स्य अवतार

हिंदू वर्षाचा तिसरा दिवस चैत्र शुद्ध तृतीया ही मत्स्य जयंती मानली जाते. विष्णूच्या प्रमुख दशावतारांपैकी पहिला अवतार मत्स्य या दिवशी अवतीर्ण झाला असे मानतात. पुराणांनुसार पृथ्वीला प्रलयापासून तारण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला.

विष्णु दशावतार

जेव्हा जेव्हा पृथ्वीवर दुष्टांचा प्रादुर्भाव वाढतो, दुष्ट सुष्टाच्या संघर्षात दुष्टाचे पारडे जड होते तेव्हा तेव्हा भगवान श्री विष्णू त्या काळच्या परिस्थितीशी अनुरूप असा अवतार धारण करतात. दुष्टांचे निर्दालन करून पृथ्वीचा भार हलका करतात. असे दहा अवतार आपण या विभागातील लेखांमधून पाहू.

Theme: Overlay by Kaira