Category: सर्व विभागांची ओळख

वर्षपूर्तीच्या निमित्ताने

गेल्या वर्षभर सर्वच जण करोना संकटाच्या सावटाखाली वावरत आहेत. बाहेर चिंताग्रस्त वातावरण असताना देखील सर्व सण – वार, व्रतवैकल्ये घरगुती वातावरणात तरीही उत्साहाने साजरे झाले. मला वाटते यातच आपल्या मराठी संपन्न वारशाचे चिरंतनत्व आहे. निरनिराळ्या विषयांना स्पर्श करणाऱ्या लेखांद्वारे आपण असेच भेटत राहू!

विष्णु दशावतार

जेव्हा जेव्हा पृथ्वीवर दुष्टांचा प्रादुर्भाव वाढतो, दुष्ट सुष्टाच्या संघर्षात दुष्टाचे पारडे जड होते तेव्हा तेव्हा भगवान श्री विष्णू त्या काळच्या परिस्थितीशी अनुरूप असा अवतार धारण करतात. दुष्टांचे निर्दालन करून पृथ्वीचा भार हलका करतात. असे दहा अवतार आपण या विभागातील लेखांमधून पाहू.

भारतीय सण

महाकवी कालिदासाने ‘उत्सवप्रियः खलु मनुष्य:’ असे म्हणले आहे. म्हणजेच मनुष्याला उत्सव, सण साजरे करणे अतिशय प्रिय आहे. आनंदाचा एक सहजसुंदर क्षण सण देऊन जातो. प्रत्येक नवीन सण नवी आशा नवा उत्साह देऊन जातो. उत्सवप्रिय भारतामधील सणांचा विचार केला तर कृषीकर्मातील महत्त्वाचे टप्पे आणि ऋतुबदल अशा दोन अंगांनी ते जाताना दिसतात. प्रत्येक सण साजरा करण्यामागे जो काही एक विशिष्ट उद्देश असतो तो त्या सणाच्या माध्यमातून समाजापर्यंत निकोपपणे पोहोचवणे हीच सणांची इतिकर्तव्यता! पूर्ण वाचण्यासाठी वरील ‘भारतीय सण’ या लिंकवर क्लिक करा.

लोकसंस्कृती – ओळख

हिंदुस्थानच्या संस्कृती इतिहासाचा संगीत हाच आत्मा असून लोकांमधील समष्टीभाव जेव्हा लय साधतो तेव्हा उत्स्फूर्तपणे लोकगीतांची निर्मिती होते. लोककलावंत लोकमनोरंजनासाठी गायन, नर्तन, नाट्यदर्शन याचे सहाय्य घेतात. सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात असणाऱ्या काही लोककलाकारांची माहिती आपण या विभागातून पाहणार आहोत. लुप्त होत चाललेल्या लोकपरंपरेची थोडक्यात माहिती करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न!

परंपरा – ओळख

सर्व मानवी संस्कृती म्हणजे परंपरा. मानवी जीवनाच्या संस्कृतीच्या सर्व शाखा – जुनी परंपरा -> परिवर्तन -> नवी परंपरा अशा चक्रात अव्याहत फिरत असतात. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे जतन करण्यासाठी दिलेला परंपरा हा सांस्कृतिक वारसा असतो. या विभागातील लेखांमधून आपण भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील अनेक परंपरांचा मनोरंजक वेध घेणार आहोत. त्याची प्रतीकात्मकता उलगडण्याचा प्रयत्न करतानाच त्यामधील शास्त्रीय आधाराचा धागा देखील शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.

देववाणी संस्कृत – ओळख

प्राचीन भारतीय मूल्यांचे ज्ञान, उपयुक्त प्राचीन ज्ञानाचा साठा असा तद्दन भारतीयत्वाचा कस असणारी संस्कृत ही एकमेव भाषा आहे. मधुरता हा या भाषेचा गाभा असून अलौकिकता तिचा धर्म आहे.या भाषेतील ज्ञान, संपन्नता पचेल त्या स्वरूपात मनोरंजक रीतीने मांडण्याचा प्रयत्न या विभागातील लेखांमधून केलेला आहे.
प्राचीन उपयुक्त भारतीय ज्ञानाचे काही कण यामधून सर्वांनाच टिपता येतील अशी आशा!

Theme: Overlay by Kaira