संस्कृत सुभाषिते – भाग ५

पितृपक्षाविषयी आपण विविध लेखांमधून माहिती घेतली. अगदी या प्रथेमागील कहाणीसुद्धा जाणून घेतली. आपल्या लक्षात आलंच असेल की या प्रथेमध्ये आणि तसेही अन्नदानाचे महत्त्व थोर आहे. म्हणूनच आज पाहू यात हे महत्त्व विशद करणारी काही संस्कृत सुभाषिते त्यांच्या अर्थासहित :

नान्नोदकसमं दानं, न तिथिर्द्वादशीसमा |

न गायत्र्या: परो मन्त्रो, न मातुर्दैवतं परम् ||

अर्थ :

अन्न व पाणी यांसारखे श्रेष्ठ दुसरे दान नाही, द्वादशीसारखी (पवित्र) दुसरी तिथी नाही. गायत्री मंत्रासारखा दुसरा मंत्र नाही (व) आईसारखे दुसरे दैवत नाही. 

 

मरुस्थल्यां यथा वृष्टिः, क्षुधार्थे भोजनं तथा |

दरिद्रे दीयते दानं, सफ़लं पाण्डुनन्दन ||

अर्थ :

हे पंडुकुमारा (अर्जुना), निर्जल प्रदेशात (वाळवंटात) जसा पाऊस, भुकेल्याला जसे भोजन (असते) तसेच दरिद्री माणसाला दान दिले असता ते सफल होते.

Theme: Overlay by Kaira