सुभाषित – २

सुभाषित :

काक: कृष्ण: पिक: कृष्ण: को भेदो पिक काकयो: ।

वसंतसमये प्राप्ते काक: काक: पिक: पिक: ।।

अर्थ :

    कावळा काळा, कोकीळ काळा, मग दोघात फरक काय? वसंत ऋतू आल्यावर कावळा (व) कोकीळ वेगळे ओळखू येतातच. (कोकीळ मधुर स्वरात कुहू कुहू करतो तर कावळा मात्र काव काव करतो.)

विवेचन :

    प्रत्येकामधील गुणांची कदर ही होतेच. त्यासाठी विशिष्ट वेळ यावी लागते. जेव्हा तुमच्याकडे जगावेगळी अशी एकमेव गोष्ट असेल तेव्हा लोक बाह्य रंगरूपाकडे लक्ष न देता तुमच्यामधील विशिष्ट गुणाकडेच आकर्षित होतात.

Theme: Overlay by Kaira