स्वयमेव मृगेंद्रता

Lion

सुभाषित –

नाभिषेको न संस्कार:
सिंहस्य क्रियते वने।
विक्रमार्जितसत्वस्य
स्वयमेव मृगेंद्रता ।।

स्पष्टीकरण  –

जगामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागते. अंगामध्ये धाडसीपणा ,पराक्रम जात्याच [जन्मतःच ] असावा लागतो. कोणीतरी आणून बळेच सिंहासनावर बसवून कोणीही राजा बनत नाही. राजा बनण्यासाठी फक्त राज्याभिषेकादी संस्कार करून उपयोग नाही . जंगलामधील सिंहाला देखील कोणी राज्याभिषेक करत नाही तर स्वतः शिकार करून आपले सामर्थ्य सिद्ध करावे लागते तरच त्याला राजा म्हणून मान्यता मिळते.

Theme: Overlay by Kaira