सुभाषित – भाग ४

   संस्कृत ही भाषा वाणी शुद्ध करणारी, सोपे व्याकरण असणारी आणि पाठांतरास सोपी म्हणून ओळखली जाते. पण याच संस्कृत भाषेत असणाऱ्या सुभाषितांमधील नर्म विनोद ही फारशी माहीत नसलेली खासियत! या विनोदाच्या विषयांमधून अगदी देव सुद्धा सुटत नाहीत!

   आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या सजीवाच्या मूलभूत प्रवृत्ती मानल्या गेल्या आहेत. भरपेट आहारानंतर निद्रादेखील सुखकारक असावी अशी सर्वांची अपेक्षा असते. पण या सुखकारक निद्रेचे शत्रू म्हणजे ढेकूण,  डास आणि तत्सम कीटक! यातील ढेकूण या शत्रूचा फारसा प्रादुर्भाव सध्याच्या जगात फारसा दिसून येत नाही पण खालील मजेदार सुभाषितात ढेकूण या निद्राशत्रूला घाबरून देवांनी काय केले हे सांगितले आहे!

कमले कमला शेते, हरः शेते हिमालये ।

क्षीराब्धौ च हरि: शेते, मन्ये मत्कुणशंकया ।।

अर्थात,

   मनामध्ये ढेकणांची शंका आणून (ढेकणांना घाबरून?) श्री लक्ष्मी कमळामध्येच निद्रा घेते. श्री शिव हिमालयामध्ये कैलासावर निद्रा घेतात तर श्री विष्णू क्षीरसागरामध्ये जाऊन शयन करतात. यःकश्चित ढेकणाच्या शंकेने  (सर्वश्रेष्ठ देव असे विविध ठिकाणी) शयन करतात.

One thought on “सुभाषित – भाग ४

Comments are closed.

Theme: Overlay by Kaira