पोतराज

एखाद्याचे मूल जगत नसल्यास मूल जगले तर ते देवीला वाहण्याचा नवस करतात. हे लक्ष्मीआईला नवसाचे सोडलेले मूल म्हणजेच पोतराज. या पोतराजांचे ढोबळमानाने तीन प्रकार मानले जातात – स्थानिक, देऊळवाले आणि गाणी म्हणणारे. पोतराज परंपरेचा सांस्कृतिक वारसा जपतानाच त्यांच्यातील माणूसपण जपण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे. काही अंशाने काळी किनार असलेले त्यांचे हे जीवन सुसह्य व्हावे यासाठी ‘पोतराज निर्मूलन अभियान’सारखे कार्यक्रम राबवून त्यांना प्रमुख समाज प्रवाहाचे घटक बनवणे अत्यंत गरजेचे आहे.