Tag: मराठी माहिती

शनिभक्तांची पंढरी – शनी शिंगणापूर

अहमदनगर जिल्ह्यात सोनईजवळ शनी शिंगणापूर ही एक शनिभक्तांची पंढरी आहे. खुद्द शनिदेवांचा येथे निवास असल्याने या गावात चोरी होत नाही. येथील घरांना दारे नाहीत. पडदे लावले जातात.कोणत्याही घराला,अगदी बँकेला देखील कुलूप लावले जात नाही.

करामती शनी महाराज

पौराणिक दृष्टीने पाहता सूर्यपुत्र असणारा हा शनिदेव स्वतः रूपाने काळा आहे. यमाचा वडीलबंधू आहे. परंतु त्याची न्यायी प्रवृत्ती मात्र आपल्या पित्याप्रमाणे (सूर्यप्रकाशाइतकी) स्वच्छ आहे. भौगोलिक दृष्ट्या जर पहिले तर शनीसारखा सुंदर दुसरा ग्रह आपल्या आकाशगंगेत नाही. अतिशय विलोभनीय असणारी त्याची कडी हे त्याचे वैभव आहे. या शनी देवांविषयी प्रचलित असणाऱ्या अनेक मनोरंजक पुराणकथा या लेखात!

वटपौर्णिमा

‘ वटपौर्णिमा ‘. संपूर्ण भारतातील हिंदू स्रीच्या जिव्हाळ्याचा दिवस. आपण आपल्यापुरता तरी संकल्प करूयात की संपूर्ण वृक्षाचे पूजन करीन,फांद्या न तोडता उलट किमान पाच वडाची रोपे लावून त्याचे जतन ,संवर्धन करीन ,पुढील पिढीला त्याचे महत्त्व समजून सांगीन,
हीच खरी आधुनिक सावित्रीची वटपौर्णिमा असेल ना?

वराह अवतार – भाग २

वराह अवताराबद्दल अजूनही काही रंजक माहिती तसेच त्यासंबंधीचा वैज्ञानिक दृष्टिकोन या लेखात.

वराह अवतार

हिंदू धर्मानुसार विष्णू दशावतारांपैकी वराह (सूकर) हा अवतार तिसरा मानला जातो.भगवान वराहाचे अवतरण भाद्रपद शुक्ल तृतीया या दिवशी झाले. त्यामुळे या दिवसास वराह जयंती असे मानले जाते. भारतामध्ये निरनिराळ्या ठिकाणी वराह जयंतीचा उत्सव साजरा केला जातो.

पिंगळा

रात्र नुकतीच सरत आलेली असते. अजून तांबडेदेखील फुटायचे असते. इतक्या ‘पिंगळा’वेळी खोपटीमधील ‘पिंगळा’ माणूस जागा होतो. भल्या पहाटे गावात येणार हा भिक्षेकरी कोणीही पैसे अथवा धान्य स्वरूपात भिक्षा दिली की स्वतःभोवती गिरकी घेऊन उडी मारतो. तेव्हा आपण समजावे की आपण दिलेले ‘पाऊड’ (दान) पावले!

खरा श्रीमंत

“चालणाऱ्याचे नशीब चालते नि बसणाऱ्याचे बसते” प्रयत्न आणि कष्ट यांचे जीवनातील महत्त्व सांगणारी ही बोधकथा आमच्या छोट्या मित्रांसाठी!

आखाजी – खानदेशी दिवाळी

अक्षय्यतृतीया खानदेशामध्ये ‘आखाजी’ म्हणून ओळखली जाते. भारतामध्ये इतर ठिकाणी कार्तिक महिन्यात दिवाळी साजरी होते. पण खानदेशात मात्र ‘आखाजी’लाच दिवाळीचे महत्त्व आहे. सर्व वार्षिक परंपरा, सालदार बलुतेदारांचे मान-पान आखाजीच्या शुभमुहूर्तावरच पार पडतात.

सुभाषित – भाग ३

निसर्गाकडून दानाचा गुण नक्कीच शिकावा. दानाचे महत्त्व सांगणारी दोन सुभाषिते या भागात!

अक्षय्यतृतीया

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानली जाणारी तिथी म्हणजे अक्षय्यतृतीया. वैशाख शुद्ध तृतीयेस ‘अक्षय्यतृतीया’ म्हणले जाते. ‘आखा-तीज’, ‘आखिदी’, ‘अकिदी’ ही याची बोलीभाषेतील नावे.

Theme: Overlay by Kaira