मेघदूत
आषाढाचा पहिला दिवस उगवला आणि जर एखाद्याला कालिदासाच्या ‘मेघदूताची’ आठवण झाली नाही तर तो खरा भारतीय साहित्यरसिकच नाही. महाकवी कालिदासाने रचलेले हे खंडकाव्य आजही रसिक मनाला भुरळ घालत आहे, प्रेरणा देत आहे.
महाकवी कालिदास – एक प्रतिभावान संस्कृत महाकाव्ये रचणारा कवी. एकदा या विद्वान महाकवीला स्वतःच्या ज्ञानाचा खूप अहंकार झाला. मग हा अहंकार दूर कसा झाला असेल बरं? वाचा या गोष्टीमध्ये.