चैत्रांगण – भाग २

चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया दारामध्ये गोमयाने सारवून त्याच्यावर पांढऱ्या शुभ्र रांगोळीने आशयसंपन्न अशी शुभप्रतिके रेखाटली जातात. या शुभप्रतिकांची संख्या 51 असते. त्यातील काही प्रमुख प्रतिके पुढे वर्षभरात येणाऱ्या सणांची द्वाही फिरवतात. तर इतर काही प्रतिके काही विशिष्ट संकेतांचे निर्देशन करतात. येणाऱ्या नवीन वर्षात आपणास ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, सुख, शांती, शीतलता, तेजोमयता लाभावी अशी संपन्न आकांक्षा बाळगणारे हे ‘चैत्रांगण’ – महाराष्ट्रभूमीचे वैभव!!