Tag: मराठी

त्रिपुरी पौर्णिमा

कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा ‘कार्तिकी पौर्णिमा’. याच पौर्णिमेला ‘त्रिपुरी पौर्णिमा’(त्रिपुरारी पौर्णिमा) असेही म्हणतात. जर या दिवशी कृत्तिका नक्षत्र असेल तर या पौर्णिमेला ‘महाकार्तिकी पौर्णिमा’ असे म्हणतात.

सिद्धीदात्री

नवदुर्गांमधील दुर्गेचे हे नववे रूप! साधकाची उपासना योग्य दिशेने चालली आहे याची प्रचिती ही देवी देते.

महागौरी

नवदुर्गांमधील आठवे रूप म्हणजे महागौरी! शिवा, श्वेतांबरा हीदेखील महागौरीची नावे. दुर्गा म्हणून हिची पूजा महाअष्टमीच्या मंगल मुहूर्तावर केली जाते.

कालरात्री

कालरात्री हे नवदुर्गांमधील सातव्या दुर्गेचे रूप. काली, महाकाली, भद्रकाली, भैरवी, रुद्राणी, चामुंडा, चंडी, रूद्रा, धुम्रवर्णा ही सर्व कालरात्रीचीच नावे.

कात्यायनी

कात्यायनी हे नवदुर्गांमधील दुर्गेचे सहावे रूप मानले जाते. काली, शाकंभरी, चंडिका ही या दुर्गेची अन्य नावे.

स्कंदमाता

नवदुर्गांमधील दुर्गेचे ‘स्कंदमाता’ हे पाचवे स्वरूप! पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून ‘पार्वती’, महादेवाची पत्नी म्हणून ‘माहेश्वरी’, शुभ्र वर्ण असणारी म्हणून ‘गौरी’ ही सर्व स्कंदमातेची नावे!

कूष्मांडा

नवदुर्गा मधील दुर्गेचे चौथे रूप म्हणजे कूष्मांडा. कूष्मांडा देवीला आदिमाया-आदिशक्ती मानले जाते. कुसुम फुलांप्रमाणे हास्य आणि अण्ड-ब्रम्हांड या दोन शब्दांची संधी होऊन कूष्मांडा हा शब्द तयार झाला आहे.

चंद्रघंटा

नवदुर्गांमधील दुर्गेचे तिसरे स्वरूप म्हणजे चंद्रघंटा.गळ्यात पुष्पमाला परिधान केलेली डोक्यावर रत्नजडित मुकुट असणाऱ्या चंद्रघंटेची पूजा शारदीय नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी करतात.

ब्रह्मचारिणी

ब्रह्मचारिणी हे नवदुर्गांमधील दुर्गेचे दुसरे रूप. ब्रह्म म्हणजे तपस्या आणि आचरिणी अर्थात आचरण करणारी. तपस्येचे, ब्रम्हाचे आचरण करणारी ती ब्रह्मचारिणी. तपश्चारिणी, उमा ही देखील हिचीच नावे.

शैलपुत्री

शैलपुत्री ही नवदुर्गेमधील दुर्गेचे पहिले रूप. नवरात्रामध्ये पहिल्या दिवशी या दुर्गेचे स्मरण, अर्चन, पूजन केले जाते. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून ही शैलपुत्री. हेमवती, उमा हीदेखील हिचीच नावे.

Theme: Overlay by Kaira