Tag: विष्णू दशावतार

नरसिंह रूपे

भगवान विष्णूंच्या दशावतारांमध्ये नरसिंह या अवताराचे जितके वैविध्य दिसून येते, तितके दुसऱ्या कोणत्याच अवताराच्या स्वरूपांमध्ये दिसून येत नाही. स्थूल मानाने पाहिल्यास स्थौण नरसिंह, गिरिज नरसिंह, केवल नरसिंह, विदरण नरसिंह, लक्ष्मी नरसिंह, योग नरसिंह, नृत्य नरसिंह अशा विविध स्वरूपात आपल्याला नरसिंह मूर्ती दिसून येतात. यामधील काही रूपे उग्र आहेत तर काही रूपे शांत आहेत.

नरसिंह जयंती

वैशाख शुद्ध त्रयोदशी युक्त चतुर्दशी ही तिथी नरसिंह जयंती म्हणून ओळखली जाते. श्री भगवान विष्णूच्या दशावतारापैकी चौथा अवतार हा नरसिंह अवतार मानला जातो.

Theme: Overlay by Kaira