गोष्ट श्रियाळ राजाची

श्रावण शुद्ध षष्ठी, म्हणजेच नागपंचमीचा दुसरा दिवस. श्रियाळ षष्ठी म्हणून हा दिवस प्रसिद्ध आहे. शिवलीलामृतामध्ये श्रियाळ राजाची गोष्ट आपल्याला आढळते. श्रियाळ राजा, त्याची राणी चांगुणा आणि त्यांचा लाडका बाळ चिलिया सर्व कुटुंब शंकराचे भक्त होते.