अधिक मास

हिंदू पंचांगानुसार ज्या चांद्र महिन्यात एकही सूर्य संक्रमण येत नाही त्याला ‘असंक्रांती मास’ म्हणतात. बहुतेक वेळा साडे बत्तीस महिन्यांनी हा मास येतो. दर तीन वर्षांनी येणाऱ्या तेराव्या महिन्याला ‘अधिकमास, मलमास, पुरुषोत्तम मास ,खरमास, मलिम्लुच मास’ अशी अनेक नावे आहेत.