Tag: akkalkot swami

श्री अक्कलकोट स्वामींच्या हातातील गोटीचे रहस्य

स्वामींचे एकाग्र चित्ताने दर्शन घेत असताना नजर स्थिरावते ती त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनी आणि आंगठयामध्ये त्यांनी तोलून धरलेल्या मोठ्या काचेच्या गोटीवर. यालाच ‘इंद्रनील मणी‘ म्हणतात. का आहे त्यांच्या हातात ही काचेची गोटी? त्याचे प्रयोजन काय? त्यामागील पार्श्वभूमी काय ?

श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे चमत्कार

अक्कलकोटचे’ श्री स्वामी समर्थ ‘हे साक्षात दत्तप्रभूंचे अवतार! स्वामींच्या चरित्रामध्ये अद्भुत आणि प्रेम या रसांचे विलक्षण मिश्रण आढळते. कधीतरी रौद्ररसाचे देखील दर्शन घडते . स्वामींनी घडवून आणलेल्या अघटित लीलांचे श्री . गोपाळबुवा केसकर यांनी पुस्तक प्रसिद्ध केले. स्वामींचे नित्य चमत्कार ‘अक्कलकोट स्वामी समर्थ बखर’ या पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवलेले आढळतात.

श्री अक्कलकोट स्वामी प्रकटदिन

चैत्र शुद्ध द्वितीया हा ब्रह्माण्डनायक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन! श्रद्धायुक्त अंतःकरणाने शरण गेल्यास या ब्रह्मांडनायक लोकाधिराजाची कृपादृष्टी आपल्यावर कायमच कृपेची बरसात करीत राहील. आणि कोणत्या न कोणत्या स्वरूपात स्वामी आपल्याला दर्शन देऊन सांगतील ‘मै गया नाही, जिंदा हूं’!

Theme: Overlay by Kaira