Tag: chaitragour

चैत्रगौरी आणि खाद्यपरंपरा

चैत्र शुद्ध तृतीया, चैत्रगौरीचे आगमन. चैत्रगौरीसंदर्भात काही महत्त्वाच्या परंपरा चालत आलेल्या दिसतात. त्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन तर दिसतोच पण त्याचबरोबर ऋतूबदलातील आहार नियोजन केल्याचे दिसून येते.

चैत्रगौरी

चैत्र शुद्ध तृतीया, ‘गौरीतीज’. संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत्वाने ब्राह्मण समाजात यादिवशी चैत्रगौरीची स्थापना केली जाते. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया (अक्षयतृतीया) अशी महिनाभर ही चैत्रगौर माहेरी येते असे समजून तिची पूजा केली जाते.

चैत्रांगण – भाग २

चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया दारामध्ये गोमयाने सारवून त्याच्यावर पांढऱ्या शुभ्र रांगोळीने आशयसंपन्न अशी शुभप्रतिके रेखाटली जातात. या शुभप्रतिकांची संख्या 51 असते. त्यातील काही प्रमुख प्रतिके पुढे वर्षभरात येणाऱ्या सणांची द्वाही फिरवतात. तर इतर काही प्रतिके काही विशिष्ट संकेतांचे निर्देशन करतात. येणाऱ्या नवीन वर्षात आपणास ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, सुख, शांती, शीतलता, तेजोमयता लाभावी अशी संपन्न आकांक्षा बाळगणारे हे ‘चैत्रांगण’ – महाराष्ट्रभूमीचे वैभव!!

चैत्रांगण – भाग १

गुढीपाडव्यापासून चैत्र महिना चालू होतो – मराठी नववर्षाची सुरुवात! बळीराजाच्या दृष्टीने हा काळ तसा थोडा विश्रांतीचा. पण त्याच्या कारभारणीला मात्र संपूर्ण वर्षाचे नियोजन याच महिन्यात करायचे असते. त्यातून चैत्रगौर, तिची लेक माहेरी आली की तिचे स्वागत दारातच केले जाते ते ‘चैत्रांगण’ ने!

Theme: Overlay by Kaira