Tag: marathi parampara

चैत्रांगण – भाग २

चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया दारामध्ये गोमयाने सारवून त्याच्यावर पांढऱ्या शुभ्र रांगोळीने आशयसंपन्न अशी शुभप्रतिके रेखाटली जातात. या शुभप्रतिकांची संख्या 51 असते. त्यातील काही प्रमुख प्रतिके पुढे वर्षभरात येणाऱ्या सणांची द्वाही फिरवतात. तर इतर काही प्रतिके काही विशिष्ट संकेतांचे निर्देशन करतात. येणाऱ्या नवीन वर्षात आपणास ज्ञान, आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, सुख, शांती, शीतलता, तेजोमयता लाभावी अशी संपन्न आकांक्षा बाळगणारे हे ‘चैत्रांगण’ – महाराष्ट्रभूमीचे वैभव!!

चैत्रांगण – भाग १

गुढीपाडव्यापासून चैत्र महिना चालू होतो – मराठी नववर्षाची सुरुवात! बळीराजाच्या दृष्टीने हा काळ तसा थोडा विश्रांतीचा. पण त्याच्या कारभारणीला मात्र संपूर्ण वर्षाचे नियोजन याच महिन्यात करायचे असते. त्यातून चैत्रगौर, तिची लेक माहेरी आली की तिचे स्वागत दारातच केले जाते ते ‘चैत्रांगण’ ने!

परंपरा – ओळख

सर्व मानवी संस्कृती म्हणजे परंपरा. मानवी जीवनाच्या संस्कृतीच्या सर्व शाखा – जुनी परंपरा -> परिवर्तन -> नवी परंपरा अशा चक्रात अव्याहत फिरत असतात. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे जतन करण्यासाठी दिलेला परंपरा हा सांस्कृतिक वारसा असतो. या विभागातील लेखांमधून आपण भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील अनेक परंपरांचा मनोरंजक वेध घेणार आहोत. त्याची प्रतीकात्मकता उलगडण्याचा प्रयत्न करतानाच त्यामधील शास्त्रीय आधाराचा धागा देखील शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Theme: Overlay by Kaira