नागपंचमी
श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच ‘नागपंचमी’. ‘नागपंचमी’ हा खास स्त्रियांचा मानला गेलेला सण. पृथ्वीचा आधार, रक्षणकर्ता अशी नागदेवतेची पुराणातील वर्णने असोत अथवा सद्यस्थितीतील नागपंचमीला होणारे त्याचे पूजन असो, प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनाचा एक कोपरा या जातिवंत प्राण्याने व्यापला आहे.