Tag: shani

शनिभक्तांची पंढरी – शनी शिंगणापूर

अहमदनगर जिल्ह्यात सोनईजवळ शनी शिंगणापूर ही एक शनिभक्तांची पंढरी आहे. खुद्द शनिदेवांचा येथे निवास असल्याने या गावात चोरी होत नाही. येथील घरांना दारे नाहीत. पडदे लावले जातात.कोणत्याही घराला,अगदी बँकेला देखील कुलूप लावले जात नाही.

करामती शनी महाराज

पौराणिक दृष्टीने पाहता सूर्यपुत्र असणारा हा शनिदेव स्वतः रूपाने काळा आहे. यमाचा वडीलबंधू आहे. परंतु त्याची न्यायी प्रवृत्ती मात्र आपल्या पित्याप्रमाणे (सूर्यप्रकाशाइतकी) स्वच्छ आहे. भौगोलिक दृष्ट्या जर पहिले तर शनीसारखा सुंदर दुसरा ग्रह आपल्या आकाशगंगेत नाही. अतिशय विलोभनीय असणारी त्याची कडी हे त्याचे वैभव आहे. या शनी देवांविषयी प्रचलित असणाऱ्या अनेक मनोरंजक पुराणकथा या लेखात!

Theme: Overlay by Kaira