Tag: vasudev

लोकगायक – वासुदेव

कृष्णाचे भक्त म्हणवून घेणारी ही जमात कृष्णाची प्रतीके आपल्या वेशभूषेत सन्मानाने वागविते. मोरपिसांचा उंच टोप, घेरदार झगा, सुरवार, खांद्यावर उपरणे, गळ्यात झोळी, कंबरेला छोटी बासरी (पावरी) अशा रूपात हे वासुदेव त्यांच्या ठराविक गावामध्ये भिक्षाफेरी मारतात. अविरत फिरणाऱ्या कालचक्राच्या गतीत ‘रामाच्या पारी’ हा शब्द जणू हरविल्यासारखा झाला आणि गावागावातून ‘दान पावलं, दान पावलं’ असे गात पायात चाळ, हातात मंजिरी, चिपळ्या वाजवित सकाळीच गाव जागे करणारे ‘वासुदेव’ अभावानेच दिसू लागले. मुळातच कृष्णभक्त असलेली ही भटकी जमात आता कालबाह्य होत आहे.

लोकसंस्कृती – ओळख

हिंदुस्थानच्या संस्कृती इतिहासाचा संगीत हाच आत्मा असून लोकांमधील समष्टीभाव जेव्हा लय साधतो तेव्हा उत्स्फूर्तपणे लोकगीतांची निर्मिती होते. लोककलावंत लोकमनोरंजनासाठी गायन, नर्तन, नाट्यदर्शन याचे सहाय्य घेतात. सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात असणाऱ्या काही लोककलाकारांची माहिती आपण या विभागातून पाहणार आहोत. लुप्त होत चाललेल्या लोकपरंपरेची थोडक्यात माहिती करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न!

Theme: Overlay by Kaira