कहाणी चित्रकथींची

लोककलाकारांमधील ‘चित्रकथी’ हा प्रकार आजघडीला अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. परंतु समृद्ध अशा निसर्गसंपन्न
तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यामधील पिंगुळी या गावातील आदिवासी ठाकर समाज ‘चित्रकथी’ ही पारंपरिक कला जोपासत आहे. चित्रांच्या आधारे कथाकथन अथवा गायन सादर करणारे ठाकर आदिवासी ‘चित्रकथी’ कलाप्रकार सादर करतात.