दिव्याची आवस
उगवत्या सूर्याला वंदन करून आपली दिनचर्या सुरु करणारी भारतीय परंपरा. आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने वातावरणातील कोंदटलेपण आणि अशा हवामानामुळे येणारी मनावरील मरगळ दीपदर्शनाने, दीपपूजनाने झटक्यात दूर होते. जेव्हा तेजाची पूजा ‘तमसो S मा ज्योतिर्गमय’ म्हणून केली जाते तेव्हा मानवाचे जीवन प्रकाशाने उजळून निघते!