पिंगळा

रात्र नुकतीच सरत आलेली असते. अजून तांबडेदेखील फुटायचे असते. इतक्या ‘पिंगळा’वेळी खोपटीमधील ‘पिंगळा’ माणूस जागा होतो. भल्या पहाटे गावात येणार हा भिक्षेकरी कोणीही पैसे अथवा धान्य स्वरूपात भिक्षा दिली की स्वतःभोवती गिरकी घेऊन उडी मारतो. तेव्हा आपण समजावे की आपण दिलेले ‘पाऊड’ (दान) पावले!