वराह अवतार – भाग २

Varah
   भगवान विष्णूंनी घेतलेल्या वराह अवताराची पौराणिक माहिती आपण ‘वराह अवतार’ या लेखात पहिली. या अवताराच्या अनुषंगाने काही रंजक भाग आपण पाहू या –

१. वराह हा जमिनीवर निर्माण झालेला प्रथम भूचर. मत्स्य – जलचल, कूर्म – उभयचर, वराह – भूचर

२. वराहाची प्रजनन क्षमता जास्त असते. पृथ्वीवर प्रजा निर्माण करण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण झाल्याचेच हे निदर्शक!

३. वराहाची तीक्ष्ण घ्राणेंद्रिये हीच त्याची शक्ती आहे. या घ्राणेंद्रियांच्या आधारेच त्याने पृथ्वीचा शोध लावला. 

४. कोणत्याही झाडाच्या मुळापर्यंत पोहिचण्याची ताकद वराहाच्या सुळ्यांमध्ये असते. तो कोणतेही झाड मुळापासून उपटू शकतो. अर्थात कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याची त्याची क्षमता असते. तसेच त्याच्या जबड्यामध्ये प्रचंड ताकद असते. 

५. वराहास राजशक्तीचे प्रतीक मानले जाते. राजाच्या अंगी असणारे गुणधर्म वराहामध्ये दिसून येतात. याच कारणामुळे चालुक्य, काकतीय, विजयनगर यांसारख्या बलाढ्य सत्तारूढ  राजवंशाचे राजचिन्ह ‘रानडुक्कर’ (आदि वराह?) होते. 

६. आंध्र प्रदेशातील ‘सिम्हलन’ येथे एक प्रसिद्ध वराह मंदिर आहे. या मंदिरात नरसिंह आणि वराह यांची एकत्रित मूर्ती असून त्याची पूजा केली जाते. ही मूर्ती मुख वराहाचे, पाय मनुष्याचे आणि शेपूट सिंहाची अशा स्वरूपात आहे. 

७. याच प्रकारचे चित्रण वैकुंठ रूपात दाखवले जाते. मध्यकालीन काश्मीरमध्ये हे चित्रण अत्यंत लोकप्रिय होते. 

८. द्रविड देशाचा राजा सुमती, ज्याचा पुत्र विमातीशी श्वेत वराहाचे युद्ध झाले, पुराणानुसार हा सुमती राजा म्हणजेच सुमतिनाथ तीर्थांकर होय. हा सुमतिनाथ ऋषभदेवाचा नातू तर भारताचा पुत्र होता. 

९. वराहाची शक्ती वाराही. सप्तमातृकांपैकी एक! अगदी सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा हिची उपासना होत होती असे म्हणतात. या वाराहीचे मुख वराहाचे असून शरीर स्त्रीचे असते. काही शिल्पाकृतींमध्ये देखील आपणास ही दिसून येते. 

१०. गंजबा सौदा येथील मातापुरा येथे वाराहीचे मंदिर असून या मंदिरात नवरात्र आणि आषाढात पूजा होते. 

   जेव्हा जेव्हा पृथ्वीवर काही संकट आले, त्यावेळी भगवान विष्णूंनी अवतार घेऊन दुर्जनांचा नाश केला व पृथ्वीचे रक्षण केले. या अवतारमालिकेत एक प्रकारची उत्क्रांती प्रक्रिया देखील दिसून येते. या सर्व अवतारांची फक्त पुराणातील वानगी (वांगी नव्हे!) म्हणून उल्लेख न होता अभ्यासक दृष्टीने याकडे पाहण्याची नितांत गरज आहे.

Theme: Overlay by Kaira